कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी होत जायंट किलर ठरले. यानंतर आज त्यांनी विधानभवनात पहिल्यांदाच आगमन केले. यावेळी सर्वांच्या नजरा धंगेकर यांच्यावरच होत्या.